छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : आदर्श बँक घोटाळाप्रकरणी तीन वर्षांपासून तुरुंगात असलेल्या अंबादास मानकापे याला खंडपीठाने जामीन मंजूर केला. सर्वच प्रकरणांत जामीन मिळाल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
आदर्श सहकारी पतसंस्था व आदर्श महिला नागरी सहकारी बँकेचा मुख्य प्रवर्तक मानकापे याने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचे तपासातून उघडकीस आले. आदर्श महिला नागरी सहकारी बँकेतील अनियमित कर्ज वाटप व इतर आरोपांमुळे या संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सर्व सदस्य तसेच मानकापे परिवारामधील वनिता मानकापे, अनिल मानकापे, सुनील मानकापे, अंबादास
मानकापे यांच्यावर २० डिसेंबर २०२३ ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. आदर्श नागरी सहकारी बँक संबंधित गुन्ह्यात सत्र न्यायालयाकडून जामीन न मिळाल्याने त्याने उच्च न्यायालयाच्या खंडपीठात अॅड. संभाजी टोपे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणातील आरोपी हे तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून तुरुंगामध्ये असून, या प्रकरणांमध्ये दोषारोपपत्रसुद्धा दाखल झाले. आता त्यांच्याकडून कसल्याही प्रकारची माहिती उपलब्ध करून घेणे बाकी नाही असे निदर्शनास आणून देण्यात आले. मानकापे परिवाराची संपूर्ण मालमत्ता ही तपास अधिकाऱ्याने जप्त केली असून, अर्जदार मानकापे याच्याकडे कुठल्याही प्रकारची मालमत्ता शिल्लक नाही असेही सांगण्यात आले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions











